आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media News In Marathi, Comments, Liks, Divya Marathi

सोशल मीडिया प्रोफाइलवर जर मानवी चेहरा असेल तर मिळतात जास्त लाइक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर जास्तीत जास्त लाइक्स आणि कॉमेंट्स हव्या आहेत, तर मग नैसर्गिक देखावे किंवा रंगवलेल्या चित्रांऐवजी छायाचित्रे पोस्ट करा! मानवी चेहरे असलेल्या छायाचित्रांना जास्तीत जास्त लाइक्स आणि कॉमेंट्स मिळण्याची शक्यता 38 टक्क्यांनी अधिक असते, असे जॉर्जिया तंत्रज्ञान संस्था आणि याहू लॅबच्या संशोधकांनी म्हटले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवरील 1.1 दशलक्ष चित्रे पाहिली. मानवी चेहरे असलेल्या छायाचित्रांवर कॉमेंट्स मिळण्याची शक्यता 32 टक्क्यांनी अधिक असल्याचेही त्यांना आढळून आले आहे.