आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकसारख्या साइट पाहण्यासाठी ४ लाख ५० हजार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक आणि गुगलसारख्या वेबसाइट्सवर युजर आयडी वापरून लॉग इन करण्यासाठी पैसे देण्याची गरज भासली नव्हती. कारण या वेबसाइट्सचा डाटाबेस सुरक्षित नाही, असे विविध घटनांतून दिसून आले आहे. यामुळेच नेट्रोपॉलिटन ही नवी वेबसाइट सुरू झाली आहे. ही फेसबुकच्या धर्तीवरच आहे. न्यूयॉर्कच्या जेम्स पीटर्सने ही वेबसाइट सुरू केली असून ते संगीत क्षेत्रातील आहेत. ही सोशल साइट क्लबप्रमाणे असून काही पैसे देऊन आपले निर्णय आणि खासगी बाबी गोपनीय ठेवता येतील, असा त्यांचा दावा आहे. जेम्सने याला सुरुवात करण्यापूर्वी जेव्हा अन्य लोकांशी सोशल वेबसाइटवर संपर्क साधला तेव्हा त्यांना संपर्क साधताना काही अडचणी आल्या.

एका वर्षासाठी १ लाख ८० हजार
जेम्स म्हणतात, मला अशी सुविधा हवी होती ज्यात कोणताही व्यत्यय न येता संपर्क किंवा संवाद साधता येईल. लोकांना आपले अनुभव सांगता येतील. या साइटवर नोंदणी करण्यासाठी ४ लाख ५० हजार रुपये मोजावे लागतील. जर एक वर्षासाठी सदस्यत्व हवे असेल तर सुमारे १ लाख ८० हजार द्यावे लागतील.

मिळतीजुळती वैशिष्ट्ये
नेट्रोपॉलिटनची वैशिष्ट्ये इतर सोशल साइट्ससारखीच आहेत. येथे मित्रांच्या स्टेट्सची अपडेट्स मिळत राहतील. या साइटवर लॉग इन करण्यासाठी २१ वर्षे वय पूर्ण झालेली असली पाहिजेत. शिवाय ख-या नावानेच साइट नोंदली जाईल. त्याचबरोबर युजरला एकही जाहिरात दिसणार नाही. यामुळेच या साइटला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असा त्यांचा दावा आहे.

thesteepletimes.com