आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल इराणच्या न्यायालयाने ब्लॉगरला ठोठावली मृत्युदंडाची शिक्षा
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
तेहरान - फेसबुकवर आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल इराणच्या न्यायालयाने शुक्रवारी एका ब्लॉगरला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात टिप्पणी केल्याचा त्याच्यावर ठपका होता. सोहेल अरबी (३०) असे ब्लॉगरचे नाव आहे. फेसबुकवर त्याचे वेगवेगळ्या नावाने आठ पेजेस आहेत.
इराणच्या इस्लामी दंडसंहिता २६२ नुसार प्रेषितांचा अवमान करणा-या दोषीला मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे, परंतु आरोपीने आपण ही टिप्पणी संतापाच्या भरात केल्याचा दावा केला किंवा अनवधानाने ही चूक झाल्याचे त्याचे म्हणणे असल्यास त्याला मृत्युदंड केला जात नाही. त्याऐवजी ७४ कोडे मारण्याची शिक्षा फर्मावली जाते. या प्रकरणात न्यायाधीशांनी सोहेलचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. अपील करण्यासाठी शनिवारपर्यंतचा (२० सप्टेंबर) अवधी आहे.