आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Social Media: Twitter Now Launche Report Twit Batan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया: ट्विटरकडून ‘रिपोर्ट ट्विट’ बटण लाँच, दुरुपयोग थांबणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने ‘रिपोर्ट ट्विट’ बटण लॉँच केले आहे. ज्या युजर्सना सतत धमक्या वा अवमानकारक संदेश प्राप्त होतात, त्यांना याचा उपयोग होईल.

याआधी मोबाइल फोन युजर्सना तसेच डेस्कटॉप वेबसाइट्सवर रिपोर्ट बटण उपलब्ध करून देण्यात आले आहे. वेबसाइट्सचा दुरुपयोग रोखण्यासाठी अनेक युजर्सनी मोहीम उभारली होती. ट्विटरवर अनेक महिलांबद्दल युजर्सकडून अपशब्द वापरले जातात. उत्तर लंडनमधील क्रिडो पेरेझ यांनी नोटांवर महिलेचे छायाचित्र असावे, यासाठी यशस्वी मोहीम चालवली होती. मात्र, त्यांना बलात्काराच्या धमक्या मिळाल्या. इतिहासतज्ज्ञ प्रो. मेरी बियर्ड, गार्डियनच्या स्तंभलेखिका हॅडले फ्रीमन यांच्याविरुद्धही अवमानकारक शब्दांचा वापर करण्यात आला आहे.