आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Software Can Identify Individuals From Credit Card Records

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाव, पत्ता क्रेडिट कार्ड नंबरशिवाय शोधणे शक्य!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अनेक क्रेडिट कार्डधारकांच्या डेटाचे विश्लेषण एमआयटी विद्यापीठाच्या संशोधकांनी केले. यात त्या कार्डधारकाची ओळख केवळ खरेदी तारीख व खरेदी केलेल्या स्थळाच्या आधारेच पटवली जाऊ शकते. या दोन बाबींच्या आधारे ९० टक्के व्यक्तींची ओळख शोधता आली. तीन महिन्यांतील १.१ कोटी क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांच्या डेटाचे विश्लेषण या अध्ययनादरम्यान करण्यात आले.

क्रेडिट कार्डने किती रकमेची खरेदी करण्यात आली, याची ठोबळ पाहणी या मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केली. तारीख, खरेदी स्थळ व रक्कम या तीन आधारांवर व्यक्तीची ओळख अचूक शोधता येत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

याचाच अर्थ तुम्ही खरेदी केलेल्या तीन बिलांच्या कॉपीज, एखादे छायाचित्र आणि तुमच्या फोनवरून काही ट्विट केले असल्यास करोडो लोकांच्या डेटामधून तुमच्या क्रेडिट कार्ड डेटाची माहिती काढणे सहज शक्य आहे.

माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह : तुमचे नाव, पत्ता, क्रेडिट कार्ड क्रमांक आणि इतर व्यक्तिगत तपशिलाची यासाठी अजिबात गरज नाही. ही माहिती गोपनीय व पर्सनल इन्फो म्हणून आपण जपत असतो. मात्र, क्रेडिट कार्ड डेटाचा रेकॉर्ड याशिवायही मिळवता येतो, हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. संशोधनादरम्यान हे नमुना माहितीच्या आधारे सिद्ध केले आहे.

हेच सर्व क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना लागू होईल, असा दावा येवेस अलेक्झांड्रे दे माँटजॉये या संशोधक विद्यार्थ्याने केला आहे. अलेक्स सँडी, विवेक सिंह, लॉरा राडेल्ली या मीडिया आर्ट्स अँड सायन्सच्या संशोधकांनी या प्रकल्पावर अध्ययन केले आहे.