आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Software Engineer Develops Power Saving Instrument

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज वाचवणा-या अंड्याचा नवीन फंडा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- घरात किंवा कार्यालयात कुणी नसेल तर तेथील विजेची उपकरणे आपोआप बंद करून वीज वाचवणारे अंडाकृती उपकरण एका अमेरिकी सॉफ्टवेअर इंजिनिअरने तयार केला आहे. ब्रायन ओ रेली असे या इंजिनिअरचे नाव असून, विजेचे भरमसाट बिल कमी कसे करावे या विवंचनेत असताना त्याला ही कल्पना सूचली.
घरातील इतर अलार्म सिस्टीमप्रमाणेच हे अंडाकृती उपकरण खोलीतील मानवी हालचालींवर लक्ष ठेवते. हे अंडाकृती उपकरण एका कंट्रोल अडॅप्टरला वायरलेस पद्धतीने जोडलेले असते. ज्याप्रमाणे अनेक विजेची उपकरणे एकाच बोर्डवर जोडलेली असतात तशीच ही रचना असते. ऊर्जाबचत आणि पुरेपूर उपयोग याबाबत मी नेहमीच विचार करीत असे. घरातील प्रत्येक उपकरण गरज नसताना बंद करणे ही माझ्या कुटुंबीयांसाठी एक नेहमीची कटकट होती. या नावीन्यपूर्ण उपकरणाचे मार्केटिंग करण्यासाठी ब्रायनने आपली नोकरी सोडली असून सुरुवातीलाच अशी 1 लाख उपकरणे अमेरिकेतील शेकडो दुकानांना पुरवण्याची ऑर्डर त्याला मिळाली आहे.
स्ट्रॅथक्लायड विद्यापीठ परिसरातील ट्रीग्रीन कंपनीत काम करीत असताना ब्रायन याने हे तंत्रज्ञान विकसित केले असून विजेचे कोणतेही उपकरण बंद करण्यापूर्वी एक मिनिट हा ऊर्जागोल आपल्याला तसा इशारा देतो. ब्रायनला एक स्मार्ट फोन चार्जर आणि स्मार्ट लाइट स्विचही तयार करायचे
असून खोलीत कुणी नसताना हे स्विच दिवे बंद करील. मात्र सूर्यप्रकाशाचा त्यावर काही परिणाम होणार नाही, तर ते फक्त अंधार पडल्यावरच काम करील, असे ब्रायनने सांगितले.