दुबई - स्विस बनावटीच्या सौरऊर्जेवरील पहिल्या विमानाचे उड्डाण या वर्षअखेरीस होईल, अशी माहिती युनायटेड अरब अमिरात सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करणा-या मासडार या कंपनीने दिली आहे. येत्या मार्च महिन्यात सौरऊर्जेवरील दोन विमानांचे उड्डाण होईल.
बेरट्रेंड पिकार्ड आणि अँड्रे बोर्सबर्ग या प्रोजेक्टमधील संस्थापक कंपन्या आहेत. विमानाच्या पंखावर बसवलेल्या १७,२०० सोलार सेल्सच्या माध्यमातून सौरऊर्जा उत्पन्न केली जाईल.