आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबियाच्या तेल टर्मिनलवर स्पीडबोटीने हल्ला, २२ ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगाझी - लिबियाच्या दोन प्रमुख तेल टर्मिनलवर कब्जा करण्यासाठी शुक्रवारी अतिरेक्यांनी स्पीड बोटीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात लिबियाचे २२ सैनिक ठार झाले. हल्ल्यानंतरही अतिरेक्यांना केंद्रावर कब्जा मिळवण्यात यश मिळाले नाही. गुरुवारी अतिरेक्यांनी सहा लोकांचा शिरच्छेद केला होता.
अल सिद्र बंदरावर अतिरेक्यांनी हल्लाबोल केला, असे लिबियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अतिरेकी ‘फज्र लिबिया’, ‘लिबिया डॉन’ संघटनेशी संबंधित होते. अतिरेक्यांनी टर्मिनलवर अनेक रॉकेटही डागले. स्पीड बोटीला सैनिकांनी नष्ट केले. तेथे चार सैनिक शहीद झाले. फज्र लिबियाच्या अतिरेक्यांनी सिरट वीज प्रकल्पावरही हल्ला केला. त्यात १८ सैनिक मारले गेले. अतिरेकी हल्ले १३ डिसेंबरपासून वाढले आहेत. त्यामुळे लिबियात इंधनाचे उत्पादन दरदिवशी आठ लाख बॅरलवरून तीन लाख बॅरल असे घसरले आहे.
आफ्रिकन युनियनच्या धर्तीवर हल्ला, ९ ठार
मोगादिशु - सोमालियाची राजधानी मोगादिशुमध्ये कडक सुरक्षा असताना आफ्रिकन संघटनेच्या कार्यालयावर गुरुवारी दहशतवाद्यांनी हल्लाबोल केला. त्यावेळी चकमकीत ९ जण ठार झाले. त्यात पाच अतिरेकी, तीन सैनिक आणि एका नागरिकाचा समावेश आहे.