आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solve To Mathematics Questions And Win Lac Rupees

खाजवा डोके: एका गणिताचे अचूक उत्तर द्या अन् झटपट लक्षाधीश व्हा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- लक्षाधीश व्हायचंय? संधी तुमचे दार ठोठावत आहे. त्यासाठी तुम्हाला थोडे डोके खाजवायचे आहे! गेली अनेक वर्षे बुद्धिवंतांनाही चकित करून सोडणारे एक गणित सोडवणार्‍याला 1 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.

होड आयलँडच्या अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने (एएमएस) बीएल काँजेक्चर या सांख्यिकी सिद्धांताचे अचूक उत्तर देणारासाठी 1 दशलक्ष डॉलरचे हे महाबक्षीस ठेवले आहे. डल्लासमधील बँकर डी अँड्र्यू‘अँडी’ बीएल यांना सांख्यिकी सिद्धांतामध्ये प्रचंड रस असून बीएल पारितोषिकासाठीची रक्कम त्यांनीच देऊ केली आहे. हे पारितोषिक आणि त्याच्या उत्तरासही त्यांचेच नाव देण्यात येणार आहे. बीएल अनुमान सोडवल्याचा पुरावा किंवा त्या अनुमानाचे एखादे उदाहरण देणाराला हे बक्षीस देण्यात येणार आहे.

1990 मध्ये अँड्र्यू विलिस आणि रिचर्ड टेलर या दोघांनी मिळून अशाच प्रकारचा फरमॅटचा शेवटचा प्रमेय सोडवून बक्षीस जिंकले होते. फरमॅटचा लास्ट थेरम आणि बीएल काँजेक्चर सांख्यिकी सिद्धांतामध्ये अनेक विधानांची प्रारूपे आहेत. ते सांगायला तर सोपे आहेत, मात्र सोडवायला प्रचंड अवघड आहेत. 2003 मध्ये रशियन गणितज्ज्ञ ग्रिगोरी पेरीलमन यांनी पॉइनकेअर काँजेक्चर सोडवले होते. मात्र, त्यांनी आर्थिक स्वरूपातील बक्षीस स्वीकारण्यास नकार दिला होता.

कसे जिंकायचे बक्षीस ?
बीएल काँजेक्चरचे बक्षीस जिंकण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. हे उत्तर प्रतिष्ठित गणित शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले पाहिजे आणि ती शोधपत्रिका एएमसीने निवडलेल्या पारितोषिक समितीच्या मते उच्च् संपादकीय गुणवत्तेची असणे आवश्यक आहे.

हे काही पहिलेच बक्षीस नाही
एखाद्या गणितीय समस्येचे अचूक उत्तर शोधण्यासाठी लक्षावधी डॉलरचे बक्षीस ठेवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2000 मध्ये क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूटने ‘मिलेनियम प्रॉब्लेम’ या नावाने प्रसिद्ध असलेली गणितीय समस्या सोडवण्यासाठी 1 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.

16 वर्षांपासून अचूक उत्तराची प्रतीक्षा
बीएलसाठी पहिल्यांदा 1997 मध्ये बक्षीस जाहीर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तरी या गणितीय समस्येचे अचूक उत्तर कोणालाही देता आलेले नाही. अँडी यांनी तेव्हा 1,00,000 डॉलरचे बक्षीस ठेवले होते. आता बक्षिसाची रक्कम वाढवून 1 दशलक्ष डॉलर करण्यात आली आहे.

युवांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
जगभरातील युवांचा गणित आणि विज्ञानामध्ये रस वाढावा अशी आपली इच्छा आहे. गणिताकडे लक्ष आकर्षित व्हावे आणि बीएल काँजेक्चर आकर्षणाचे केंद्र ठरावे हा बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा आपला मूळ हेतू आहे. गणिताच्या विस्मयचकित करणार्‍या जगाकडे अधिकाधिक युवा आकर्षित होतील, अशी माझी अपेक्षा आहे.
-अँडी बीएल