आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somali Parliament Hit By Car Bombing, Gun Attack

सोमालियाच्या संसदेवर कारबॉम्बिंग, सात ठार; लोकप्रतिनिधी अडकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमालियाच्या संसदेवर आज (शनिवार) मोठा दहशतवादी हल्ल्या झाला यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये सात दहशतवादी आणि एका सुरक्षा कर्मचा-याचा समावेशे आहे.

संसदेच्या इमारतीवर आत्मघातकी दहशतवादी, कारबॉम्बिंग व इतर दहशतवाद्यांच्या सहाय्याने मोठा हल्ला करण्यात आला. संसदेच्या इमारतीजवळ जोरदार गोळीबार व बॉंबस्फोटही घडवून आणण्यात आले. संसदेत अनेक लोकप्रतिनिधी अडकले आहेत. येथे सुरु असलेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातला. एक आत्मघातकी दहशतवादी व कारमधून बॉंबस्फोट करणारा दहशतवादीही ठार झाला. येथे अजूनही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छायाचित्र - संग्रहित