आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांकडून सोमालियातील राष्ट्रपती भवन उडविण्याचा प्रयत्न, 12 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोगादिशु- सोमालियाच्या राष्ट्रपती भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांत पंतप्रधान व माजी गुप्तचर कमांडरच्या दोन सचिवांचा समावेश आहे. हा दहशतवादी हल्ला अलशबाब या दहशतवादी संघटनेने केला आहे.
संरक्षणमंत्री अब्दुलकरीब हुसैन यांनी सांगितले की, हल्लेखोर दहशतवादी राष्ट्रपती भवनात घुसण्याच्या प्रयत्नात होते. या दरम्यान एका आत्मघातीने स्वत:ला उडवून दिले त्यात नऊ हल्लेखोरही मृत्यूमुखी पडले. मृतात सोमालिया सरकारचे दोन अधिकारी व जवानाचा समावेश आहे.
हुसैन यांनी सांगितले की, हल्लेखोरांना कार बॉम्बच्या मदतीने राष्ट्रपती भवन उडवून द्यायचे होते. हल्लाचा हेतू नुकसान पोहचण्याचा होता. मात्र स्थानिक लष्कर आणि अफ्रीकन युनियनच्या शांती सेनेने त्यांचा डाव उधळून लावला. हल्ल्यावेळी राष्ट्रपती हसन शेख मोहम्मद राष्ट्रपती भवनात बसले होते. मात्र त्यांना कोणतेही नुकसान झाले नाही. कारण भवनाच्या गेटवरच हल्लेखोरांना मारण्यात यश आले.
राष्ट्रपती हसन शेख यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही संघटना नष्ट होत चालली आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. देशाचे सैनिक अशा दहशतवादाचा बहादुरीने मुकाबला करीत आहेत अशा शब्दात जवानाचा गौरव केला.
या हल्ल्याचा इतर देशांनी निषेध केला आहे. यूएनचे प्रतिनिधी निकोलस यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटले आहे की, हल्ला कठोर व हिंसात्मक आहे. सोमालिया जनतेला जरूर यातून थोडा त्रास होईल, मात्र यातून दहशतवाद्यांना काहीही हासिल होणार नाही.
पुढे पाहा, या हल्ल्यातील छायाचित्रे...