वृत्तसंस्था
Dec 27,2011 05:45:49 PM ISTरोमः समुद्री चाच्यांनी ओमानच्या खाडीत एका इटालियन जहाजाचे अपहरण केले असून अपहृत जहाजावर 7 भारतीय असल्याची माहिती मिळाली आहे.
इटलीच्या एका खासगी कंपनीचे 'एन्रिको लेव्होली' या जहाजाचे सोमालीयन चाच्यांनी अपहरण केले आहे. या जहाजाच्या अपहरणाचा 2006 मध्येही प्रयत्न झाला होता. परंतु, इटलीच्या नौदलाने त्वरित कारवाई करुन जहाजाची सुटका केली होती.
जहाजावर एकूण 18 जण होते. त्यात 7 भारतीय, 6 इटालियन आणि 5 युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे.
सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या एका तेलाच्या टँकरची सुटका करण्यात आली आहे. कंपनीने खंडणीची रक्कम दिल्यानंतर जहाजाला सोडण्यात आल्याची माहिती आहे. 'सॅव्हीना सेलीना' नावाचे हे जहाज तब्बल 10 महिने चाच्यांच्या ताब्यात होते.