आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालियात लाखो लोक भूकबळीच्या खाईत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगादिशू - सोमालियातील भूकबळीची समस्या वाढतच चालली असून अशीच स्थिती राहिली तर आॅगस्टपर्यंत देशात लाखो लोकांचे बळी जातील, अशी भीती संयुक्त राष्ट्राच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
सध्या संयुक्त राष्ट्राचे अधिकारी हे सोमालियाच्या दौ-यावर आहेत. येथे अन्न व पाण्याचे संकट असल्याचे सहा महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. जुलै-आॅगस्टपर्यंत सोमालियात हीच स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशात कुपोषणाचे प्रमाण जगात सर्वाधिक असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मदत करणा-या संस्थेचे प्रमुख मार्क ब्राऊडन यांनी म्हटले आहे. देशात सुमारे अडीच लाख लोक हे अजूनही दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुपोषणाचे येथील प्रमाण धक्कादायक आहे. गेल्या वर्षी याच कारणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. आगामी काळात लहान मुले याचे सर्वाधिक बळी ठरतील. जन्माला येणारे सुमारे पन्नास टक्के मुले ही भयंकर किंवा घातक कुपोषणाने ग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटते, असे ब्राऊडन यांनी सांगितले.
कुपोषणाच्या दरात घट पाहायला मिळत असली तरी आगामी सहा-सात महिन्यात परिस्थिती आणखी मोठे संकट घेऊन येणारी ठरू शकते. दुसरीकडे देशातील सरकार केवळ नामधारी आहे. वेगवेगळ्या टोळ्यांच्या लढ्यांमुळे येथील सामाजिक वातावरण पूर्णपणे बिघडलेले आहे.
परिस्थिती गंभीर
सोमालियातील मानवी स्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या वतीने 1.3 अब्ज डॉलर्सचा निधी पाठवण्यात आला आहे. हा निधी मिळाला असला तरी परिस्थितीत काहीही बदल झालेला दिसून येत नाही. उलट स्थिती आणखी गंभीर आहे. मागील वर्षी हजारो लोकांनी सोमालिया सोडून इथोपिया, केनिया गाठले होते. दुष्काळ व भूकबळीमुळे किमान 15 लाख लोकांचे विस्थापन झाले आहे. दुसरीकडे देशातील टोळ्याच्या संघर्षामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होतो, असे सूत्रांनी सांगितले.