आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Peshawar: मी डॉक्टर होणार, पुन्हा हल्ला झाल्यास जखमींना वाचवणार, वाचा आपबीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - येथील आर्मी स्कूलमध्ये जे दहशतवाद्यांच्या गोळ्यांचे शिकार बनले त्यामध्ये एक 26 वर्षीय शिक्षिका सादिया गुल यांचाही समावेश होतो. मुलींसाठी शाळा सुरू करण्याचे सादिया यांचे स्वप्न होते. पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी दहशतवाद्यांना लपून वडिलांना अखेरचा फोन केला होता. त्यावेळी त्यांच्यात काय बोलणे झाले याविषयी त्यांनी माहिती दिली.

सादियाचे वडील पिता गुल शहजाद खट्‌टक यांनी सांगितले की, ‘सादिया इंग्रजी विषय शिकवत होती. हल्ल्याच्या वेळी मला तिचा फोन आला. ती अत्यंत चिंतेत वाटत होती. ती म्हणाली, मी काही मुलांबरोबर एका खोलीत बंद आहे. पण येथून बाहेर पडण्याचा काहीही मार्ग नाही. तिचे अखेरचे शब्द होते की, अब्बू! मैं कमरे में महफूज हूं। मुझे फायरिंग की आवाज आ रही है। लेकिन शायद ही बाहर निकल सकूं।’ त्यानंतर त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला पण सादियाचा फोन वाजत राहिला तरी कोणी उत्तर दिले नाही. दुपारनंतर त्यांना समजले की, ती या जगात राहिलेली नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, जख्मी मुलांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर बनणार