आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना खांद्यावर घेऊन मुलाने घडवली हजयात्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आयुष्यात एकदा तरी हजयात्रा करावी, अशी धारणा मुस्लिम समुदायांमध्ये आहे. उतारवयापर्यंत प्रत्येक जण प्रयत्नात असतो. आई-वडिलांची ही यात्रा व्हावी यासाठी मुस्लिम पुत्रांची धडपड सुरू असते. इथे आलेले असेच एक पिता-पुत्र सध्या चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरले आहे.

आपल्या ८० वर्षाच्या वडिलांना व्हिलचेअरऐवजी खांद्यावर घेऊन हज यात्रा घडविणारे मोहंमद रशीद प्रकाशझोतात आले आहेत. वडिलांना अन्य साधनांपेक्षा खांद्यावरून नेण्यातच समाधान मिळाल्याची भावना रशीद यांनी व्यक्त केली. वडिलांच्या सोयीसाठी व्हिलचेअरचा वापर केला असता मात्र त्यांच्यासाठी आपल्या खांद्यापेक्षा अन्य चांगले सोईस्कर साधन नव्हते.

ध्यास आणि स्वप्न
वडिलांचे वय ८० झाल्यानंतर खर्च कितीही येवो त्यांची यात्रा घडवण्याचा निश्चय केला. यात्रेदरम्यान वडिलांना जमिनीवर पाऊल ठेवू द्यायचे नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. त्याआधी अनेकवेळा मी त्यांना खांद्यावर घेऊन हजला आल्याची स्वप्नं पडली होती, असे रशीद म्हणाले.