आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi News In Marathi, Sikh Riots Case In US

अमेरिकी न्यायालयाने सोनिया गांधींना पासपोर्टची कॉपी मागितली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- गेल्या वर्षी 2 ते 9 सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेत उपस्थित नसल्याचा पुरावा म्हणून अमेरिकी न्यायालयाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पासपोर्टची कॉपी मागितली आहे.
1984 मध्ये भारतात उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी न्युयॉर्कच्या ब्रुकलेन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वरील कालावधीत सोनिया गांधी यांना समन्स जारी करण्यात आला होता. परंतु, अमेरिकेत उपस्थित नसल्याने समन्स मिळाला नाही, असे सोनिया गांधी यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. ही याचिका खारीज करण्यात यावी, अशी मागणी वकिलाने केली आहे.
यासंदर्भात 10 जानेवारी रोजी सोनिया गांधी यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र पुरेसे नसल्याचे कारण सांगून न्यायाधीश ब्रियन एम. कॉगन यांनी त्यांना पासपोर्टची एक कॉपी देण्यास सांगितले आहे. 7 एप्रिल 2014 पूर्वी पासपोर्टची कॉपी न्यायालयात सादर करावी, असेही कॉगन यांनी म्हटले आहे.