आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sony Hacking Row North Korea Threatens To Blow Up White House

...तर अमेरिकेवर हल्ला करु, उत्तर कोरियाची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योंगयांग - 'द इंटरव्ह्यू' या चित्रपटावरुन अमेरिका आणि उत्तर कोरियामध्‍ये तणाव वाढत चालले आहे. जर अमेरिकेने हॅकिंगचा आरोप मागे घेतला नाही तर उत्तर कोरिया अमेरिकेवर हल्ला करु शकतो, अशी धमकी कोरियाने दिले आहे.

चित्रपटा मागे आहे अमेरिका
'द इंटरव्ह्यू' या चित्रपटाच्या निर्मितीमागे अमेरिका असून तो आमच्या देशाचा अपमान करण्‍याचा हेतू त्यात दिसतो, असा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. अमेरिकेने खोडसळ कारवाया थांबवले नाहीतर आम्हाला हल्ला करावा लागेल, असे कोरियाने बजावले आहे.

वादामागील कारण
अमेरिका आणि उत्तर कोरिया दरम्यान वाद 'द इंटरव्ह्यू' या चित्रपटावरुन सुरु झाला आहे. चित्रपटात कॉमेडी आहे. पण त्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हत्या दाखवण्‍यात आली आहे. प्रोमोज समोर आल्यानंतर चित्रपट निर्माता कंपनी 'सोनी' चे काम्प्यूटर सिस्टिम हॅक करण्‍यात आली.कंपनीने जर चित्रपट रिलीज केल्यास सोनी कंपनीचे घोटाळे जगासमोर आणले जातील अशी धमकी देण्‍यात आली आहे.

प्रसिध्‍द होणार नाही, ओबामा नाराज
उत्तर कोरियाच्या धमकी नंतर चित्रपटावर बंदी घालण्‍यात आली. कोरियाच्या धमकीमुळे चित्रपटा प्रसिध्‍द होणार नाही, अशी नाराजी अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली आहे.