आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसासारखे तुरुतुरू चालणारा रोबोट येतोय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - माणसाच्या पायासारखी हालचाल करू शकणारा रोबोट विकसित झाला आहे. या संशोधनामुळे रोबोटच्या चालण्यातील मर्यादा संपुष्टात येणार आहेत. नव्या संशोधनामुळे रोबोटची चाल नैसर्गिक होईल.

जपानच्या वासदा विद्यापीठातील ह्युमिनाइड रोबोटिक्स इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएबीआयएएन - 2 आर रोबोट विकसित केला आहे. या रोबोटची कंबर आणि गुडघा लवचिक आहे. रोबोटच्या पायाच्या बोटात आणखी सुधारणा करण्यात आली असून त्यात लवचिकता आणण्यात आली आहे. 5 फूट उंच व 64 किलो वजनाचा रोबोट 41 अंशांतून सहज हालचाल करतो. शास्त्रज्ञांनी माणसाच्या पावलाचे अंतर व हालचाल न्याहाळली. याच्या अभ्यासातून रोबोटची चाल विकसित करण्यात आली. या प्रयोगात माणूस आणि रोबोटमधील पाऊल टाकण्यातील फरक 0.6 सेकंदाचा दिसून आला.