आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण आफ्रिकेतील गो-यांचे काळे कारस्थान; भारतीयांना मायदेशी हाकलण्याचा कट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांसह सर्व कृष्णवर्णीयांना देशाबाहेर हाकलण्याचा कट, दक्षिण आफ्रिकन सरकार उलथवणे आणि कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांची हत्या करण्याचे कारस्थान रचणा-या वर्णविद्वेषी गटाचा म्होरक्या माइक डू टोइट याला प्रिटोरिया उच्च न्यायालयाने राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात धाडले आहे. माइकच्या नेतृत्वाखालील वर्णविद्वेषी गो-या लोकांच्या टोळक्याने हे भयंकर षड्यंत्र रचले होते.
माईक टोइटच्या वर्णविद्वेषी गटाविरुद्ध गेल्या नऊ वर्षांपासून विविध खटले चालू आहेत. या टोळक्यावर बॉम्बस्फोट, राष्ट्रद्रोह आणि सरकारविरुद्ध बंड करण्याचा कट रचणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद चळवळीला यश मिळून 1994 मध्ये कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले होते. अल्पसंख्याक गो-यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखालील हा पहिलाच मोठा खटला आहे. कृष्णवर्णीयांचा तिरस्कार करणारा माइक हा विद्यापीठात प्राध्यापक होता. माइकसोबतच बोरमॅग ही संघटनाही त्यांना सामील होती. बोरमॅग म्हणजे ‘शक्तिशाली गौरवर्णीय आफ्रिकन.’ या संघटनेच्या 20 जणांवरही खटले चालू आहेत.
जहाजातून रवानगी
12 लाख भारतीय वंशाच्या नागरिकांना जहाजात बसवून भारतात धाडण्याचा कट डू टोइट याने रचला होता. सन 1860 मध्ये उसाच्या शेतात काम करण्यासाठी ब्रिटिशांनी शेकडो भारतीयांना दक्षिण आफ्रिकेत धाडले होते. यापैकी अनेकांनी मायभूमी समजून तिथेच वास्तव्य केले.
‘बिग ब्रदर’मध्ये पुन्हा वर्णभेद
अमेरिकी विद्यापीठात वर्णभेद