आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकेत मतदानासाठी मतदारांच्या रांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या. 1994 मध्ये मंडेला पहिल्यांदा सत्तारूढ झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आहे. सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची आशा आहे. आफ्रिकेत लोकसंख्येपेक्षा निम्मे साधारण 2 कोटी 50 लाख नोंदणीकृत मतदार आहेत. मतदानासाठी 22 हजार 263 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली.प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व प्रणालीनुसार दक्षिण आफ्रिकी मतदार उमेदवाराला नव्हे, तर पक्षाला मत देतात. राष्ट्रीय आणि राज्य सरकारसाठी दोन स्वतंत्र मतपत्रिकांतून एकाच वेळी मतदान केले जाते.