(दुर्घटना घडण्यापूर्वी काढण्यात आलेला जिराफचा फोटो. त्याला खुल्या कंटेनरमधून नेण्यात येत होते.)
जोहन्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)- प्रिटोरिया परिसरात दोन जिराफला खुल्या कंटेनरमधून नेण्यात येत होते. यातील एका जिराफचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्ध झाले, की मृत्यू झालेल्या जिराफचे शीर एका पुलाला धडकले होते. 2013 मध्ये रिलीज झालेल्या टोल फिलिप्स यांनी निर्देशित चित्रपट Hangover-3 मध्ये अशीच दुर्घटना दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील कलाकार जॅक गॅलिफियानकीस अशाच प्रकारे जिराफला घेऊन जात असतो. या जिराफचे शीर पुलाला धडकल्यावर तुटून वेगळे होते.
ही घटना उघडकीस आल्यावर शेकडो लोकांनी ड्रायव्हरला लक्ष्य केले. जिराफचे शीर पुलाला धडकेल याची कल्पना ड्रायव्हरला कशी आली नाही, असे लोकांनी म्हटले आहे. जिराफला असे नेणे ही एक क्रूरता आहे, असे एका नेटिझन्सने म्हटले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, जिराफला कसे नेण्यात येत होते....आणि चित्रपटाचा असाच एक सिन...