आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South African Government Denies Mandela Is 'vegetative'

मंडेलांची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास डॉक्टरांचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे. त्यांचे अवयव पूर्णपणे निकामी होत नाहीत तोपर्यंत ही प्रणाली काढण्यात येणार नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

94 वर्षीय मंडेला गेल्या महिनाभरापासून प्रिटोरियाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची अचेतन अवस्था असल्याचे सांगितले गेले होते.अंतिम क्षणांमध्ये त्यांच्या शरीराचा छळ होऊ नये यासाठी जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्यात यावी असा सल्ला देण्यात आल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.त्यामुळे त्यांच्या प्रकृतिबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान,जीवनरक्षक प्रणाली काढण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याचे मंडेलांचे मित्र डेनिस गोल्डबर्ग यांनी ‘सिटी प्रेस’या साप्ताहिकाला मुलाखत देताना सांगितले.अवयव निकामी होत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न डॉक्टर करीत आहेत. मशीनच्या साहाय्यानेच त्यांचा श्वासोच्छवास सुरू आहे. मी त्यांच्याशी दहा मिनिटे बोललो.माझी ओळख सांगितली.त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिले. त्यांच्या गळ्याला पाइप असल्यामुळे ते बोलू शकले नाहीत, परंतु त्यांचा जबडा हलला.त्यांना बोलायचे होते असा अनुभव गोल्डबर्ग यांनी सांगितला.