आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Australian Wildfires Rage Thousands Flee Homes

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भडकली भीषण आग; हजारो लोक झाले बेघर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- ऑस्ट्रेलियातील जंगलात आज (शनिवारी) भीषण आग लागली. आगीमुळे परिसरातील हजारों लोकांना बेघर व्हावे लागले. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया राज्यातील सहा घरे आगीत जळून खाक झाले आहेत. वार्‍यामुळे आग पसरत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

देशातील फायर सर्व्हिसचे प्रवक्ता डेनियल हेमिल्टन यांनी सांगितले की, दक्षिण ऑस्ट्रेलियातील एडिलेड हिल्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. 100 पेक्षा जास्त घरे अजूनही आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. दोनशेहून अधिक फायरमन आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. एअरक्राफ्ट्सच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरु आहे. बचाव कार्यात चार फायरफाइटर्स किरकोळ जखमी झाले आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा, आगीची भीषणता दाखवणारे छायाचित्रे...