आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • South Korea : 70 Nation 3500 Couple Kniting Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण कोरिया : 70 देशांची 3500 जोडपी लग्नाच्या बेडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सेऊल - सेऊलपासून 60 किलोमीटर अंतरावरील गॅप्योंगच्या चेओंगशिम पीस सेंटर चर्चमध्ये रविवारी सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात 3500 जोडपी विवाहबद्ध झाली. या महाविवाह समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. या चर्चची स्थापना 1054 मध्ये ख्रिश्चन धर्माचे प्रचारक मून सन म्युंग यांनी केली होती. या चर्चमध्ये 1961 मध्ये पहिल्यांदा सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी 33 जोडपी विवाहबद्ध झाली होती. म्युंग यांच्या निधनानंतर चर्चमध्ये पहिल्यांदाच सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला होता.