आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • South Korea Auditorium’S Roof Collapse At University Orientation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण कोरियामध्‍ये हिमवृष्‍टी; छत कोसळून 10 जणांचा मृत्‍यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्‍यॅनझू- दक्षिण कोरियाच्‍या आग्‍नेय भागातील ग्‍यॅनझू शहरात बर्फवृष्‍टीमुळे एका सभागृहाचे छत कोसळून 10 जणांचा मृत्‍यू झाला आहे. तसेच 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. सूत्रांनुसार, या सभागृहात बुसानच्‍या विद्यापीठातील विद्यार्थी एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्‍वागत समारंभाच्या कार्यक्रमात 560 विद्यार्थी सहभागी होते.

आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाने दिलेल्‍या म‍ाहितीनुसार, मृतांमध्‍ये नऊ विद्यार्थ्‍यांसह एका नागरिकाचा समावेश आहे. 103 लोक जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

छतावर मोठ्याप्रमाणावर बर्फ साचल्‍याने छत कोसळले. बचाव युद्धपातळीवर सुरु असून प्रतिकुल हवामानामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याचे अग्निशमन दलाच्‍या किम-ईन-यो यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून या परिसरात तुफान बर्फवृष्‍टी होत आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापनदलाचे जवान बचावकार्य करत आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, दुर्घटनेतील छायाचित्रे...