आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Korea Ferry: Vice Principal Rescued From Sinking Ship Found Hanged

बुडालेल्या जहाजातून वाचलेले उपप्राचार्य कांग यू यांची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉकपो / जिंदो (दक्षिण कोरिया) - जलसमाधी मिळालेल्या जहाजातून बचावलेले व डानवन हायस्कूलचे उपप्राचार्य कांग मिन यू (52) यांनी शुक्रवारी आत्महत्या केली. गुरुवारीच त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. सेऊल नावाच्या जहाजात 475 प्रवाशांमध्ये 352 डानवन विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक होते. हे जहाज सहल साजरी करण्यासाठी जात होते.

यू यांचा मृतदेह एका जिमबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू कसा व का झाला, याची चौकशी केली जात आहे. बुडणार्‍या जहाजातून 179 जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. अद्याप 268 जण बेपत्ता आहेत. यात बहुतेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 28 जणांच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आहे.

जहाजातील लोकांना वाचवण्याच्या कार्यात समुद्राच्या अजस्र लाटांचा मोठा अडथळा होत असल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले. अडथळा असतानाही शुक्रवारी आठ पाणबुडे जहाजाच्या केबिनपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. त्यांनी जहाजातील डायनिंग हॉल आणि कॅफेटेरियाचा व काही केबिनचा तपास केला. तेथे कोणीही दिसून आले नाही. जहाजातील लोक जिवंत असतील या आशेवर ऑक्सिजनदेखील पाठवण्यात आला आहे.