आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Korea Ferry With 476 Passengers Sinks News In Marathi

TITANIC? बुडणाऱ्या जहाजातून 160 प्रवाशांना वाचविले, 290 अद्याप बेपत्ता, PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- दक्षिण कोरियाच्या दक्षिण किनाऱ्या नजीकच्या समुद्रात आज (बुधवार) सकाळी एक विशाल जहाज बुडाल्याने दोन प्रवासी मृत्युमुखी पडले. जहाज बुडत असताना 160 प्रवाशांना वाचविण्यात यश आले असून 290 प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. या जहाजमध्ये 325 शाळकरी मुलांसह एकूण 474 प्रवासी होते.
दक्षिण कोरियाच्या सुरक्षा आणि प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 476 प्रवाशांना घेऊन हे जहाज दक्षिणेकडील जेजू आयलंडकडे निघाले होते. या दरम्यान जहाज अचानक एका बाजूला झुकले आणि बुडू लागले. यावेळी जहाजावरील अधिकाऱ्यांनी कंट्रोल रुमकडे मदतीचा संदेश पाठविला. त्यानंतर लगेच मदतीसाठी कोस्टगार्डच्या बोटी पाठविण्यात आल्या. प्रवाशांना सुरक्षितपणे बुडत्या जहाजातून बाहेर काढण्यात आले. परंतु, तरीही दोन प्रवाशांना वाचविण्यात अपयश आले आहे.
कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जी-येओंग नावाची 27 वर्षीय महिला आणि आणखी एक अनोळखी प्रवासी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत जवळपास बहुतेक प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. कोणत्या कारणांमुळे जहाज एका बाजूला कलंडले याची नेमकी माहिती मिळालेली नाही.
दुर्घटनेबाबत सांगताना जहाजावरील एक विद्यार्थी लीम ह्युग मीन म्हणाला, की दुर्घटना झाली तेव्हा जहाज प्रचंड हलत होते. आम्हाला मोठे धक्के बसत होते. आम्ही एकमेकांच्या अंगांवर पडत होतो. यावेळी काही लोकांना गंभीर दुखापती झाल्या. मी लाईफ जॅकेट घातले. माझ्या मित्रानेही लाईफ जॅकेट घातले. त्यानंतर आम्ही जहाजातून समुद्रात उड्या मारल्या. समुद्राचे पाणी अतिशय गार होते. तरीही आम्ही कसेबसे नजीकच्या आयलंडवर आलो.