आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Korea Moves To Defuse Tensions With The North

दक्षिण कोरियाकडून पॅट्रियट इंटरसेप्टर क्षेपणास्त्र तैनात, अमेरिकेचाही इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल/ वॉशिंग्टन- दक्षिण कोरियाने गुरुवारी राजधानी सेऊलमध्ये दोन पॅट्रियट क्षेपणास्त्र तैनात केले. पॅट्रियट हे शत्रूच्या क्षेपणास्त्राचा अचूक वेध घेणारे क्षेपणास्त्र आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते किम मिनसिओक म्हणाले, स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र 30 कि.मी.पर्यंतचे क्षेपणास्त्र नष्ट करू शकते.
दक्षिण कोरियाकडे पॅट्रियट एडवान्सड् कॅपेबिलिटी(पीएसी) 2 क्षेपणास्त्र आहेत. दक्षिण कोरियाने सीमेवर सर्व रणगाडे तैनात केले आहेत. याबरोबर अमेरिकी लष्कराचे जवानही तैनात आहेत. दरम्यान डिवचण्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने उत्तर कोरियाला दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी व नाटो प्रमुख एंडर्स फॉघ शुक्रवारी सेऊल दौर्‍यावर जात आहेत. उत्तर कोरिया या दिवशीही क्षेपणास्त्र डागू शकते, अशी भीती दोन्ही देशांना आहे.
पुढे वाचा किम उन व आणि चाचणीविषयी, क्लिक करा....