आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Korea Moves To Defuse Tensions With The North And China

हुकूमशहांच्या युद्धखोरीमुळे सगळे जग दहशतीखाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे किंग जोंग उन यांनी तिसर्‍या अण्वस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याने जागतिक पातळीवर युद्धाचे ढग जमा झाले आहेत. दक्षिण कोरियाने जबरदस्त धमकी देताना उत्तर कोरिया कोणत्याही क्षणी मुसुदन, स्कड आणि नोदोंग क्षेणास्त्रे सोडू शकतो, असे म्हटले आहे. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अण्वस्त्र चाचणी प्रकरणात अमेरिकेने केलेला हस्तक्षेपही कामी येताना दिसत आहे. नाजूक परिस्थिती पाहता चीननेही उततर कोरियासोबतचे संबंध कमी केले आहेत. तिसर्‍या अण्वस्त्र चाचणीनंतर जपानने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चीन
सीमा बंद : चीन आणि उत्तर कोरियाची सीमा पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

दक्षिण कोरिया
आम्हीदेखील तयार : सेऊलमध्ये दोन पेट्रियाट इंटरेप्टर क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.

अमेरिका
इशारा : अमेरिकेने उत्तर कोरियाला सद्य:स्थितीत शांत राहण्याचा, सल्ला दिला आहे.

(PHOTO :उत्तर कोरियासोबत युद्धाची शक्यता गृहीत धरून दक्षिण कोरियाने जवानांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.)