आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्वस्त्र हल्ल्यासाठी तोफ ; 50 वर्षांपूर्वी रशियाने केली होती नि्र्मीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शीतयद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शस्त्रास्त्र तयार करण्याची स्पर्धाच लागली होती. 1950 च्या दशकात अमेरिकेने अण्वस्त्र हल्ला करु शकेल अशा तोफांची निर्मीती केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानेही अण्वस्त्र हल्ला करु शकेल अशा तोफेची निर्मीती केली होती. तिचे नाव होते 'ऑब्जेक्ट 271' . त्यावेळी सोव्हिएत संघावर स्टॅलिनचे राज्य होते. शस्त्रास्त्रांच्या या स्पर्धेच्या काळाला युद्धाभ्यासक 'माय टँक इज बिगर दॅन युवर' युग मानतात.

अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयार करण्यात आलेल्या या रणगाड्यांवर विशाल बॅरल लावण्यात आलेली होती. त्यामुळे तोफेचा आकार आणि वजन बरे वाढले होते. मात्र, अण्वस्त्र हल्ल्यासाठी ही बनावट योग्य नव्हती. त्यात काहीतरी कमी राहिले होते. मग याची निर्मीती त्यांनी का केली ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

त्यांनी पाहिले होते, की अमेरिकेकडे अशी तोफ होती आणि रशियाला तोफेशिवास अण्वस्त्र सज्ज होण्यात रस नव्हता.

अमेरिकेने 1963 मध्ये 85 टन वजनाची 280 एमएमची 'होवित्जर गन' तयार केली होती. तिला 'अ‍ॅटोमिक अ‍ॅनी' म्हटले जात होते. त्याद्वारे अण्वस्त्र हल्ला केला जात होता. त्याला लिटील फेला ही म्हटले जात होते. मात्र, त्याचा तयार केला गेलेला व्हिडिओ खरा नव्हता.