आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता अंतराळात विसर्जित करा प्रियजनांच्या अस्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - प्रियजनाच्या मृत्यूनंतर अस्थिविसर्जन करण्यासाठी अंतराळ हे नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था, नासातील अभियंत्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने ही सुविधा देऊ केली आहे. मात्र, त्यासाठी 1,995 डॉलर एवढा खर्च येणार आहे.

आप्तस्वकीयाच्या मृत्यूनंतर त्यांचे अवशेष चिरंतन राहावेत, यासाठी एलसियूम अंतराळ कंपनीने अंतराळात अस्थिविसर्जनाचा प्रस्ताव ठेवला आहे. अंत्यसंस्कारानंतर राहिलेले अवशेष एका विशेष कॅप्सूलमध्ये ठेवून कंपनीचे यान अंतराळातील ‘स्मृतियात्रे’साठी रवाना होणार आहे. कॅप्सूल कक्षेत स्थिरावरल्यानंतर रॉकेटच्या प्रवासानुसार विशिष्ट अ‍ॅपद्वारे कॅप्सूलची स्थिती समजणार आहे. काही महिन्यांनंतर रॉकेट पृथ्वीच्या वातावरणाशी संपर्कात आल्यानंतर ते जळून नष्ट होईल. नासातील अभियंते थॉमस सीवेट यांनी एलसियूम अंतराळ कंपनीची स्थापना केली आहे. त्यांचा हबल अंतराळ दुर्बिणीसह अनेक अंतराळ मोहिमांत सहभाग राहिला आहे. 2014 च्या उन्हाळ्यात यानाचे उड्डाण होणार असून सध्या केवळ ‘ऑर्डर’ स्वीकारल्या जात आहे.