आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मॉस्को - अंतराळ विज्ञानात मानवाने शुक्रवारी आणखी एक महत्त्वाची कामगिरी नोंदवली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी कझाकिस्तानच्या बॅकानूर येथून सोयूज यान रवाना करण्यात आले. हे यान 5 तास 45 मिनिटांत आपल्या नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचले. एखादी मानवी मोहीम आयएसएसपर्यंत कमी वेळेत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत आयएसएसवर पोहोचण्यासाठी किमान 45 तासांचा कालावधी लागत होता.
शॉर्टकट
मोहिमेत तीन अंतराळवीर सहभागी झाले होते. हे सर्व आयएसएससाठी रवाना झाले होते. अंतराळवीरांचा हा गट आयएसएसवर 5 महिन्यांहून अधिक काळ घालवणार आहे. आयएसएसवरील अंतराळवीरांची संख्या 6 एवढी झाली आहे. डॉकिंगमध्ये सोयूजला सुमारे 2 तास लागले.
सोयूजची कामगिरी
कसे झाले शक्य ?
* आतापर्यंत आयएसएसवर पोहोचण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागत होता. यानाला पृथ्वीच्या 30 वेळा प्रदक्षिणा कराव्या लागत होत्या. नवीन तंत्रज्ञानामुळे सोयूजने पहिल्यांदा थेट मार्गाचा अवलंब केला.
१नवीन तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या केवळ चार परिक्रमा कराव्या लागल्या. आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर असलेली संशोधन प्रयोगशाळा आहे.
3 वर्षांपूर्वीची योजना
* अंतराळ मोहिमेसाठी तीन वर्षांपूर्वी तयारी सुरू झाली होती. या महामार्गावरून मानवी मोहीम राबवण्यापूर्वी रशियाने तीन वेळा मानवरहित कार्गो फ्लाइटने आयएसएसला रसद पुरवली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.