आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद तरूणाई आकंठ बुडाली RED WINE मध्ये, झाला उत्साही जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेन. हा शब्द जरी उच्चारला की, लगेच डोळ्यासमोर येते ती म्हणजे बुल रेस... येथील ही सांडांची शर्यत संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. दरवर्षी 7 ते 14 जुलै दरम्यान होणार्‍या या शर्यतीला पाहाण्यासाठी जगभरातून पर्यटक स्पेनला येतात. स्पेनच्या पमपलोना शहरात या शर्यतीचे विशेष आयोजन करण्यात येते. सात दिवस चालणार्‍या या उत्सवाची सुरूवात 6 जुलैला 'रेड वाईन फेस्टीव्हल'ने झाली. म्हणजेच उत्सवाच्या सुरूवातीला तेथे जमलेले सर्व पर्यटक खेळाडू आणि चाहते एकमेकांच्या अंगावर रेडवाईन टाकून हा उत्सव साजरा करतात. मद्य धुंद तरूणाईची मद्यक्रीडा अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. सर्वत्र लालच लाल रंग, तसेच खेळाडूंच्या गळ्यात या सांडांना आकर्षित करण्यासाठी असलेले लाल रूमाल, त्यात ही लाल वाईन... हे दृष्य पाहणे म्हणजे एक अविस्मरणीय सोहळा पाहणे असेच आहे.
स्पेनच्या या शर्यतीची सुरूवात 14 व्या शतकात झाली होती. स्पेनमध्ये या शर्यतीचे प्रसारण राष्ट्रीय टीव्हीवरही केले जाते. स्पेनच्या या रेसबद्दल अनेकांनी टीका केली आहे. या खेळाला काही जणांनी अमानवीय खेळ म्हणूनही संबोधले आहे. मात्र कोणी काहीही म्हणो स्पेनवासी या खेळाचे अगदी मनःपुर्वक आनंद घेताना दिसतात... अशाच या रेड वाईन बाथ आणि शर्यतीचा जल्लोष आम्ही पोहोचवतोय खास तुमच्यासाठी...
पाहा ही काही क्षणचित्रे या सोहळ्याची....

(फोटो - वरील सर्व फोटो हे केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहे)