आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानला खडसावले म्‍हणून थरूर यांचे व्हिडिओ भाषण रोखले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - भारताचे केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी भारत-पाकिस्तानी उद्योजकांच्या कार्यक्रमात व्हिडिओद्वारे केलेल्या भाषणात पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याबद्दल जोरदार टीका केली. संयोजकांना ते अडचणीचे वाटल्याने त्यांचे भाषण रोखण्यात आले. आर्थिक आघाडीवर शांततामय उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थरूर यांनी भाषणात थेट पाकिस्तान सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधल्यानंतर पाकिस्तानसह भारतीय शिष्टमंडळातील सदस्यही चकित झाले.