आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speedy Broadband Develops, Internet Access Become Free

सर्वाधिक वेग असलेल्या ब्रॉडबँडचा विकास करण्यात यश,इंटरनेट अ‍ॅक्सेसची चिंता होणार इतिहास जमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंटरनेट अ‍ॅक्सेसची चिंता हा विषय लवकरच इतिहासजमा झाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण संशोधकांना सर्वाधिक वेग असलेल्या ब्रॉडबँडचा विकास करण्यात यश आले आहे. एकाच वेळी 44 हाय डेफिनेशन चित्रपटांना ट्रान्समिट करणे यातून शक्य आहे. त्याचा वेग प्रतिसेकंद 1.4 टेराबाइट्स एवढा तुफानी असेल. भारतातील इंटरनेटच्या वेगापेक्षा हा वेग 18350 पट जास्त आहे.
लंडनमधील फायबर नेटवर्कमध्ये यासंबंधीचा महत्त्वपूर्ण प्रयोग करण्यात आला. त्यात ब्रिटिश टेलिकॉम (बीटी) आणि फ्रेंच नेटवर्किंग कंपनी अलक्टेल-लुसेंट यांनी हा अभ्यास केला. मध्य लंडनच्या बीटी टॉवर येथे गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हा प्रयोग करण्यात आला. त्याचा सर्वाधिक फायदा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (आयएसपीएस) यांना होणार आहे. माहितीची अतिशय प्रचंड वेगाने देवाण-घेवाण करणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी ब्रॉडबँडची मदत घेता येईल. माहितीची देवाण-घेवाण सर्वाधिक वेगवान पद्धतीने करण्याची ही जगातील पहिलीच प्रणाली ठरणार आहे. कारण वेग गाठण्यात संशोधनातून यश आले आहे. प्रयोगशाळेच्या बाहेर त्यात यश आल्याने व्यावहारिकदृष्ट्या हा शोध महत्त्वाचा मानला जात आहे.
2017 नंतर फेसबुकचा वापर कमी होणार
सध्या स्मार्टफोनच्या माध्यमातून फेसबुकचा वापर करणा-या लोकांची संख्या 80 कोटींहून अधिक आहे, परंतु गेल्या काही महिन्यांत तरुण युजर फेसबुककडे हळूहळू पाठ फिरवू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत : ब्रिटनमध्ये तर फेसबुक केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या हातातील साधन बनले आहे. तरुण आणि नवतरुणांना त्यात अजिबात रस उरलेला नाही. 2017 पर्यंत फेसबुक तरुण युजरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. युजरने फेसबुकचा वापर करणे कमी केल्याचे कंपनीचे वित्त अधिकारी डेव्हिड एबर्समन यांनी कबूल केले.
फायबरची क्षमता
इंटरनेटच्या परिभाषेत एखादा व्हिडिओ प्रवाहित करण्यासाठी लांब आणि रुंद असा मार्ग आवश्यक असतो, परंतु स्टँडर्ड वेब पेजेससाठी मात्र फार थोडा भाग पुरेसा ठरतो. त्यावरच इंटरनेटची क्षमता ठरते.