आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायाजाल! घरावर चिकटली माणसे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - स्पायडरमॅनसारखी घराच्या भिंतींवर चिकटून राहणारी ही माणसे पाहून आश्चर्य वाटेल. पण हे मायाजाल आहे. अर्जेंटिनाचे कलाकार लिआंद्रो एर्लिच यांच्या इन्स्टॉलेशन कलाकृतींचे ईस्ट लंडनमध्ये प्रदर्शन सुरू आ्हे. त्यांनी‘डेलस्टन हाऊस’ही आभासी कलाकृती तयार केली आहे. 20 व्या शतकातील घराचे चित्र जमिनीवर ठेवण्यात आले.त्यावर तिरपा आरसा ठेवण्यात आला.त्यामुळे आपण जमिनीवरील चित्रावर झोपलो की घरावर चिकटून उभा राहिल्यासारखा थ्रीडी चित्राचा आभास निर्माण होतो.