आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spike S 512 Supersonic Jet Will Have Screens Instead Of Windows

एस -512 विमानात खिडकीऐवजी सभोवती असेल भव्य स्क्रीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - तुम्ही विमानातून प्रवास करत आहात. तुमच्या अवतीभोवती काचेच्या छोट्या पारंपरिक खिडक्यांऐवजी पातळ जाडीचे भव्य स्क्रीन दिसेल. त्यावर विमानाबाहेर लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यातून घेतली जाणारी छायाचित्रे व सभोवतालचे चित्र लाइव्ह टेलिकास्टसारखे तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे तुमच्या विमान प्रवासाचा आनंद द्विगुणित होईल. सुपसॉनिक जेट विमानांची निर्मिती करणार्‍या अमेरिकेतील स्पाइक एअरोस्पेस कंपनीने अशा स्वरूपाच्या विमानाचे डिझाइन विकसित केले असून लवकरच अशा प्रकारच्या विमानाची निर्मितीही केली जाणार आहे. यात वैमानिकाच्या केबिनपासून सर्व बाजूला खिडक्यांऐवजी पातळ स्क्रीन लावलेली असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार या बदलानुसार विमानाची निर्मिती करणे बरेचसे सोपे होईल. एस 512 सुपसॉनिक जेट विमान 2018 पर्यंत बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.
सुरक्षेच्या मुद्दय़ावर प्रश्नचिन्ह : सेंट्रल लँकेशायर विद्यापीठातील एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे तज्ज्ञ डॉ. डॅरेन अँन्सेल यांनी सुरक्षेबाबत काही प्रश्न उपस्थित करताना सांगितले, ‘विमानाला खिडक्या नसतील तर दुर्घटनेच्या वेळी विमान कुठे कसे लँड होत आहे हे कसे समजणार ? समजा बाहेरच्या कॅमेर्‍यांनी काम करणे बंद केले तर
काय होईल ? स्क्रीन अखंड असेल तर त्यामुळेही सुरक्षेला धोका आहेच. विमानात नैसर्गिक प्रकाश येणार नाही. त्यामुळे लोकांना विमानाऐवजी आपण एखाद्या ट्यूबमधून प्रवास करत आहोत असे वाटू शकते.’
इतर कंपन्याही शर्यतीत
एरियन व गल्फस्ट्रीम कंपन्या अशाच प्रकारचे विमान तयार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने त्यासाठीची स्पर्धा आगामी काळात आणखी तीव्र होऊ शकते.

पुढील स्लाइडमध्ये, 18 प्रवासी प्रवास करू शकणार