आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spying Softwear In One Lakh Computers, India And Other Nation In Trape

अमेरिकेने एक लाख संगणकांत टाकले हेरगिरी सॉफ्टवेअर, भारतासह अनेक देश जाळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने जगभरातील एक लाखापेक्षा अधिक संगणकांमध्ये हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर टाकले आहे. आपले निगराणीचे बेकायदा कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेने हा बंदोबस्त केला आहे. भारतासह अनेक देश हेरगिरीच्या जाळ्यात अडकले आहेत.
सायबर विश्वात हेरगिरी करण्यासाठी हे सॉफ्टवेअर सक्षम आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनएसए) गोपनीय मोहिमेतील भिन्न पैलूंचा अमेरिकी वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने गौप्यस्फोट केला आहे. इंटरनेट बंद असले तरीही संगणकामध्ये घुसखोरी करून माहिती मिळवणारे सॉफ्टवेअर्स एनएसएकडे आहेत, असेही यात म्हटले आहे. एनएसएने हेरगिरी करण्यास उपयुक्त असे यूएसबी कार्ड या संगणकांमध्ये लावले आहे. उच्च क्षमतेच्या रेडिओ सिग्नल्सच्या माध्यमातून या संगणकांमधून संदेश मिळवले जातात. भारतासह जगभरातील अनेक देशांचे पोलिस आणि सुरक्षा दले या रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करतात. यामध्ये रशिया, सौदी अरेबिया,मेक्सिको, पाकिस्तान आणि युरोपियन संघातील देशांचा समावेश आहे. सन 2008 पासून एनएसएचा हा उपद्व्याप सुरू असून त्याला ‘क्वांटम ’असे नाव देण्यात आले आहे.
अमेरिके ला लाभ : 1. सायबर व डिजिटल हल्ले करण्यास अमेरिकन लष्कर सक्षम. 2. संगणक नेटवर्कशी जोडलेल्या दहशतवादी संघटनांवर नजर ठेवणे शक्य 3.अमेरिकीविरोधी कारवाया वेळीच कळल्यास त्याला रोखणे शक्य.
हे कळले नाही : अमेरिकेने हेरगिरीची उपकरणे व यंत्रणा संगणकांमध्ये लावली कशी व या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे अथवा नाही हे कळू शकले नाही.