आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srilankan Government Should Investigate On Crime Tamil Devid Cameroon

तामीळ जनतेवरील अत्याचारांची श्रीलंका सरकारने चौकशी करावी - डेव्हिड कॅमेरून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - लिट्टेसोबतच्या गृहयुद्धात श्रीलंका लष्कारने तामीळ जनतेवर केलेल्या अत्याचारांची श्रीलंका सरकारने स्वतंत्र आयोग नेमून येत्या मार्च महिन्यापर्यंत चौकशी करावी ही चौकशी करण्यास टाळाटाळ केल्यास संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाकडे धाव घेऊ, अशी मागणी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी केली आहे.कॅमेरॉन यांची चौकशीची मागणी श्रीलंका सरकारने फेटाळली. वसाहतवादाचे दिवस संपले असून कुणाच्याही आणि कोणत्याही ‘दबावाखाली’ चौकशी करण्यात येणार नाही. आंतरराष्ट्रीय चौकशीसही मान्यता दिली जाणार नाही अशा शब्दांत श्रीलंके ने ही मागणी धुडकावली.
राष्ट्रकुल देशांमधील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या (चोगम) निमित्ताने श्रीलंकेच्या दौ-यावर आलेल्या कॅमेरॉन यांनी शुक्रवारी तामीळबहुल जाफना भागात भेट दिली होती. श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर (सन 1948) जाफनास भेट देणारे ते पहिलेच परदेशी राष्ट्रप्रमुख ठरले आहेत. कॅमेरॉन यांनी जाफनातील तामीळ जनतेची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. यामुळे राजपाक्षे सरकारचा तिळपापड झाला आहे. जाफनाला भेट दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांची भेट घेतली होती. त्या वेळी तामीळ अत्याचाराच्या मुद्द्यासह विविध विषयांवर उभय नेत्यांची मनमोकळी चर्चा झाली, असे कॅमेरॉन यांनी सांगितले.
युद्धातून सावरलो नाही, वेळ हवा
गृहयुद्धातून अद्याप सावरलेलो नाही. त्यामुळे थोडा वेळ हवा आहे. असे उत्तर राजपाक्षे यांनी दिल्याचे कॅमेरॉन यांनी सांगितले; पण राजपाक्षेंनी सर्वच म्हणणे मान्य केले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तामीळ लोकांना सन्मानाने आयुष्य जगता यावे यासाठी मानवी हक्क आणि प्रसारमाध्यमांनाही स्वातंत्र्य दिले पाहिजे.
राष्ट्रकुलाने पोलिस होऊ नये : श्रीलंका
कॅमेरॉन यांच्या पत्रकार परिषदेनंतर तत्काळ श्रीलंकेचे तीन मंत्री हिमल श्रीपाल डिसिल्वा, केहेलिया राम्बुक्वेले अणि डग्लस देवनंदा यांनी परदेशी पत्रकारांची पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी राष्ट्रकुलने आंतरराष्ट्रीय पोलिसाची भूमिका बजावू नये, असे या त्रिकुटाने सांगितले.
काय म्हणाले डेव्हीड कॅमेरॉन : लिट्टेसोबत गृहयुद्धातील अखेरच्या टप्प्यातील घटनांची (तामिळींवरील अत्याचार) येत्या मार्च महिन्यापर्यंत पारदर्शक, विश्वासार्ह व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. अन्यथा स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे धाव घेऊ.