आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेस‍बुकच्या कर्मचा-यांमध्‍ये मोठ्याप्रमाणावर दुजाभाव, महिलांपेक्षा पुरूषांचाच आहे जास्त भरणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनफ्रॅन्सिस्क‍ो - जगातील क्रमांक एकाची सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक विवादातून सुटलेली नाही. कंपनीने आपल्या 10 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आपल्या कर्मचा-यांची माहिती सादर केली आहे. या प्रसिध्‍द सोशल साइटमध्‍ये काम करणारे बहुतेक हे श्‍वेत वर्णीय पुरूष असून त्यांचेच येथे वर्चस्व आहे. कंपनीचे जगभर 6 हजार 500 कर्मचारी असून 31 टक्के महिला आहेत, तर 69 टक्के पुरूष आहते.
अमेरिकेतील कंपनीच्या ऑफ‍िसमध्‍ये 57 टक्के कर्मचारी हे श्‍वेतवर्णीय आहेत, असे फेसबुकने सांगितले आहे. तसेच येथे 34 टक्के आशियाई वंशाचे लोक, 4 टक्के लॅटिन अमेरिकन, 2 टक्के कृष्‍णवर्णीय, 3 टक्के अन्य असे प्रमाण आहे. फेसबुकच्या टेक टीममध्‍ये मोठ्याप्रमाणावर स्त्री-पुरूष प्रमाणात असंतुलन आहे. येथे 85 टक्के पुरूष आहेत.

सिलिकॉन व्हॅलीच्या इतर कंपन्यांमध्‍येही फेसबुकपेक्षा निराळी स्थिती नाही असू मानू नये. येथील कंपनीच्या मोठ्या पदावरील 74 टक्के अधिकारी हे श्‍वेतवर्णीय आहेत. आम्हाला खूप काही करायचे आहे, असे आमचे आकडे सांगत आहे असे फेसबुकने सांगितले आहे.

(फेसबुकचे ऑफिस)