आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात इम्रान खानने काढलेल्या रॅलीत चेंगराचेंगरी, 07 ठार, 42 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या मुल्तान शहरात शुक्रवारी सरकारच्या विरोधात काढलेल्या रॅलीमध्ये चेंगरा चेंगरीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 लोक जखमी आहेत. ही रॅली पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांनी आयोजित केली होती. इम्रान खान यांच्या भाषणानंतर नागरिक स्टेडियमच्या बाहेर निघत होते त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला.
पाकिस्तानात ऑगस्ट महिन्यापासूनच राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआई)चे अध्यक्ष इम्रान खान आणि धर्मगुरू ताहीर अल-कादरी यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निवडणुकांत गैरव्यवहार केल्याचा आरोप लावत राजीनाम्याची मागणी केली आहे. इमरान विविध शहरांमध्ये सरकारच्या विरोधात सभा करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी कराची आणि लाहोरमध्ये सभा घेतल्या होत्या. मुल्तानच्या या सभेमध्ये मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्यांबाबत दुःख व्यक्त केले आहे. स्थानीय आरोग्य अधिका-यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
पुढे पाहा, रॅलीचे PHOTO