आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stars Boycott Beverly Hills Hotel Over Brunei \'sharia\' Law News In Marathi

ब्रुनेई सुलतानच्या या डोळे दिपवणाऱ्या हॉटेलमध्ये आता जाणार नाहीत सेलिब्रिटी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- अमेरिकेच्या प्रसिद्ध बेवर्ली हिल्स हॉटेलमध्ये आतापासून सेलिब्रिटींची गर्दी कमी झाली आहे. याचे कारणही जरा विचित्र आहे. या प्रसिद्ध अमेरिकी हॉटेलमध्ये कडक इस्लामी कायदे लागू होणार आहेत. त्यामुळे भविष्यात हॉलिवूडसह इतरही चित्रपटसृष्टीचे कार्यक्रम येथे आयोजित केले जाणार नाहीत.
बेवर्ली हिल्स हॉटेलवर एका गुंतवणूक कंपनीची मालकी आहे. ब्रुनेईचे सुलतान हसन अल-बोल्किया यांची ही कंपनी आहे. त्यांनी गेल्या आठवड्यापासून कडक इस्लामी कायदे लागू केले आहेत. हे मुस्लिम शरीया कायद्यावर आधारित आहेत. या सुलतानच्या गुंतवणूक कंपनीकडे बेवर्ली हिल्स सारखे अनेक आलिशान हॉटेल्स आहेत.
यासंदर्भात डेडलाईन हॉलिवूड न्युज वेबसाईटने सांगितले आहे, की हॉलिवूडचे प्रस्तावित कार्यक्रम आता बेवर्ली हिल्सऐवजी दुसऱ्या आलिशान हॉटेल्समध्ये आयोजित केले जातील. त्यामुळेच निधी गोळा करण्यासाठी घेण्यात आलेल्या एक कार्यक्रम कॅलिफोर्नियातील कल्वर सिटी येथे नेण्यात आला. यात सोनी पिश्चर एंटरटेनमेंटच्या को-चेअरपर्सन एमी पास्कल आणि त्यांची लहान बहिण जेनी पास्कल यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुढील स्लाईडवर बघा, या आलिशान हॉटेलची छायाचित्रे...