आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 हजार फूटांवरून कसे दिसते युरोप, स्टेप इन टू द वाइड पर्यटकांसाठी खुले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्समध्ये आल्प्सच्या पर्वतरांगांमधील एगुईले डू मिडी हे सर्वाधिक उंचीवरील दुसरे शिखर आहे. 12, 600 फूट उंचीवरील या शिखरावर काचेची एक खोली तयार करण्यात आली आहे. येथून पर्यटक आल्प्स पर्वतरांगांचे सौंदर्य न्याहाळू शकतील. काचेच्या या पेटार्‍याचे नाव स्टेप इन टू द वॉइड असे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ शून्यात पाऊल ठेवणे असा होतो. शनिवारी हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. या परिसरात वाहतूक सुविधा पुरविणार्‍या एका कंपनीने खास पर्यटकांसाठी स्टेप इन टू द वाइडची खोली तयार करून दिली आहे.