आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: जाणून घ्या, कामासाठी झपाटलेल्या एका माणसाची कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांनो, आज 24 फेब्रुवारी 2014, जगाला आयपॅड, आयफोन, स्मार्टफोनसारख्या वस्तू भेट देणार्‍या स्टीव्ह जॉब्जचा जन्म दिवस. वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी हे जग सोडून गेलेला हा माणूस आयुष्यभर झपाटल्यासारखे काम करत होता. त्याला वेड होते नावीन्याचे, सतत नव्या शोधाचे. स्टीव्हच्या आईने त्याला दत्तक दिले होते. 17 व्या वर्षी स्टीव्ह कॉलेजात दाखल झाला खरा, पण त्याचे मन तिथे रमत नसे. अक्षरलेखनात (कॅलिग्राफी) तो खूप तरबेज होता. स्वत:च्या घरातील गॅरेजमध्ये स्टीव्हने आपला मित्र वॉझबरोबर एक कंपनी स्थापन केली व नाव ठेवले ‘अँपल.’ दहा वर्षांत त्याने आपला पहिला संगणक मॅकॅन्तोश जगाला दिला आणि सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यातील टायपोग्राफी म्हणजे त्याच्या अक्षरलेखनाचा चमत्कारच होता.

वयाच्या अवघ्या तिशीत हा माणूस 2 अब्ज डॉलर्स उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक बनला. त्या वेळी त्याच्या कंपनीत 4 हजार कर्मचारी काम करत होते; पण दुर्दैवाने त्याला त्याच्याच कंपनीतून बाहेर जावे लागले. तो थेट रस्त्यावर आला; परंतु त्याच्या धाडसाच्या आणि ज्ञानाच्या भुकेने तो पुन्हा झेपावला. काही महिन्यांतच त्याने ‘नेक्स्ट’ आणि ‘पिक्सार’ नावाच्या कंपन्या सुरू केल्या. झपाटलेल्या स्टीव्हच्या पिक्सार या कंपनीने जगातील पहिली अँनिमेटेड फिल्म तयार केली. आज जगातला सर्वात मोठा अँनिमेटेड स्टुडिओ याच कंपनीचा आहे. मग तो पुन्हा सन्मानाने अँपल या पूर्वीच्या कंपनीत परतला. मात्र, स्टीव्हचे आयुष्य सतत संघर्षाने भरलेले राहिले. त्याला शांतता कधी लाभलीच नाही. सन 2004 मध्ये त्याला स्वादुपिंडाच्या कर्करोगाने घेरले. डॉक्टरांनी त्याचे आयुष्य संपत आल्याचे जाहीर केले; पण हा बहाद्दर थोडेच गप्प बसणार!

शस्त्रक्रियेनंतर तो पुन्हा झपाटून कामाला लागला. 1998 मध्ये आयमॅक, 2001 मध्ये आयपॉड, 2005 मध्ये आयफोन असे एकेक उपकरण त्याने जगाला दिले व जगही त्याचे वेडे झाले. विशेषत: जगभरातील तरुण वर्गाला तर त्याने वेडच लावले. बिल गेट्ससारख्या संगणकतज्ज्ञानेही त्याचे तोंडभरून कौतुक केले व तो आपल्यापेक्षाही सरस आहे हे कबूल केले. ऑक्टोबर 2011 मध्ये पुन्हा त्याच्या आजाराने डोके वर काढले. या वेळी मात्र स्टीव्हला आपण जगू शकणार नाही याची जाणीव झाली. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदरच त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचे आयफोन-4 हे उत्पादन बाजारात आले आणि त्याचे निधन झाले. प्रचंड कल्पनाशक्ती आणि मानवी संवेदना असणारा हा माणूस जगाला अनोखे देणे देऊन 5 ऑक्टोबर 2011 रोजी हे जग सोडून गेला.

पुढील स्लाइड्वर पाहा स्टिव्ह जॉब्स यांची तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो...