आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
स्टीव्ह जॉब्ज यांचा 23 वर्षांपूर्वीचा हा फोटो आजवर कुणी पाहिला नसेल. हा फोटो प्रथमच सिलिकॉन व्हॅलीतील बक्स रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आला आहे. जगभरातील व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आणि टेक मुगल्स यांच्यातील डिजिटल युगाला आकार देणा-या अनेक करारांवर याच रेस्टॉरंटमध्ये स्वाक्ष-या झाल्या आहेत. जॉन ब्राउनली नावाचे पत्रकार कुणाला तरी भेटण्यासाठी बक्स कॅफेमध्ये गेले होते. तेथे त्यांनी स्टीव्ह जॉब्जचा एक फोटो पाहिला. ग्राउचो मार्क्स चश्मा घालून हसतानाचा तो फोटो आहे. जॉन यांनी अनेक वर्षे अॅपल बीट कव्हर केले होते. त्या काळात स्टीव्ह जॉब्जचे अनेक फोटो त्यांनी पाहिले, पण त्यांच्या आयुष्यातील हा पैलू पाहिला नव्हता. आइनस्टाइनचा जीभ बाहेर काढून बसलेला हा फोटो जगासाठी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच स्टीव्हचा हा फोटो अॅपलसाठी महत्त्वाचा आहे. अॅपलने हा फोटो ‘थिंक डिफरंट’चा टॅग लावून जगभरातील मॅक चाहत्यांना दाखवायला हवा होता; पण तो बक्सच्या एका दरवाजावर लावण्यात आला आहे. या फोटोचाही एक किस्सा आहे.
बक्स रेस्टॉरंटचे मालक जेमिस मॅकनिवन यांनी जॉब्जचे जुने घर दुरुस्त केले होते. त्या काळी एका पार्टीत मॅकनिवन यांच्या गर्लफ्रेंडने जॉब्सना तो चश्मा दिला होता. जिम्बरॉफ नावाच्या फोटोग्राफरने पार्टीतील फोटो क्लिक केले होते, पण तेव्हाचा हा फोटो नव्हता. हा फोटो 1989 मधील आहे. तेव्हा जिम्बरॉफ एका मॅगझिनच्या कव्हरसाठी शूट करत होते. मॅगझिनला त्या अंकासाठी जॉब्सचा फोटो हवा होता. त्या वेळी जिम्बरॉफच्या विनंतीवरून जॉब्जने ही पोज दिली होती. जॉब्जना तेव्हा तो ग्राउचो चश्मा घालायची इच्छा नव्हती, असे जिम्बरॉफचे म्हणणे आहे. त्या दिवसांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी जिम्बरॉफने हा फोटो त्याच्या मित्रांना मेल केला. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या. मॅकनिवनने जिम्बरॉफकडून जॉब्जच्या या फोटोची एक कॉपी बक्स रेस्टॉरंटसाठी घेतली आहे. ग्राउचो चश्मा घातलेल्या जॉब्ज यांच्या फोटोवरून त्यांना जॉब्जसोबतच्या पार्टीची आठवण होते. किकस्टार्टर या प्रोजेक्टअंतर्गत जिम्बरॉफ हा फोटो लवकरच 1300 रुपयांत ऑ नलाइन विक्रीसाठी ठेवणार आहे.
cultofmac.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.