आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop The Political Revenge, Sri Lanka Former President Rajapakase Said

राजकीय सूड घेणे थांबवा, श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - आमचे कुटुंब १९३१ पासून राजकारणात आहे, पण आमच्या घरांवर कधीही छापे टाकण्यात आले नाहीत. हा राजकीय सूड घेणे थांबवा, अशी तीव्र प्रतिक्रिया श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी दिली.

सोमवारी राजपक्षेंच्या तंगाल्ले येथील घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना लुंबार्गिनी स्पोर्टस कारचा शोध घ्यायचा होता, मात्र या धाडीत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. श्रीलंकेत ८ जानेवारी रोजी झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत मैथरीपाला सिरीसेना हे नवे राष्ट्राध्यक्ष बनले. तेव्हापासून सत्तापालट थांबवण्याचे प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली राजपक्षेंच्या मागे नव्या सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप : राजपक्षे व कुटुंबीयांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल आहे. सत्ताधारी मित्रपक्षातील मार्क्सवादी सदस्य जनता विमुक्ती पेरमुन यांनी ही तक्रार केली आहे. येथील माध्यमांवरही राजपक्षेंच्या कुटुंबाची उधळमापपणे खर्च करण्याची दृश्ये प्रसारित केली जात आहेत. राजपक्षेंची मुले व दोन भावांवरही भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तत्कालीन संरक्षण सचिवांच्या एका शस्त्रास्त्र संस्थेच्या दुकानावरही पोलिसांनी छापे टाकले. त्यांच्यावर काही शस्त्र गहाळ केल्याचे आरोप आहेत. ३,४७३ शस्त्रांच्या यादीतील केवळ १५१ शस्त्रच अस्तित्वात आहेत.