वॉशिंग्टन - अमेरिकेत उद्भवलेल्या हिमवादळामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते, रेल्वे तसेच हवाई वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला असून सुमारे 3700 विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. शिवाय शहरांतील रस्त्यांवर बर्फ साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नॉर्थ कॅरोलिना, कॅलिफोर्निया, साऊथ कॅरोलिना आणि न्यू इंग्लंडमध्ये अडीच सेंमीपासून ते 18 इंचांपर्यंत हिमवर्षाव झाल्याची नोंद आहे. हिमवर्षाव आणि धुक्यामुळे आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल 3.63 लाख घरांमध्ये अंधार पसरला आहे. सॅन दिएगो बंदरावरील अमेरिकन नौदलाचे जहाज यूएसएस कार्ल विनसनला धुक्याने कवेत घेतले आहे. बाजूच्या छायाचित्रात रस्त्यावर वाहनांची लांब रांग दिसत आहे.
3.63 लाख घरांमध्ये वीज नाही
3700 हवाई उड्डाणे रद्द
13 लोकांचा मृत्यू