आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sydney हल्लेखोर अल कायदाशी संबंधित तर झेंडा जमात-ए-नुसराचा असल्याचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शरहामध्ये लिंड्ट चॉकलेट कॅफेमध्ये एका हल्लेखोराने सुमारे 40 नागरिकांना बंधक बनवले आहे. हा हल्लेखोर अल कायदाशी संलग्न असण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर त्याने तो झेंडा दाखवला आहे तो झेंडा जमात-ए-नुसराचा असल्याची शक्यता आहे. जमात-ए-नुसरा ही अल कायदाशी संलग्न असणारी दहशतवादी संघटना आहे.
फोटोमध्ये जे झेंडे दिसत आहेत त्याबाबत काही माहिती खालीलप्रमाणे...

1. फोटोमध्ये पहिल्या क्रमांकावर दाखवण्यात आलेला जो झेंडा आहे, असाच झेंडा मार्टिन प्लेसवर फडकवण्यात आला होता. त्याचा वापर हिज्ब उज तहरीर ही संघटना करते. ही एक जागतिक इस्लामिक संघटना आहे. या संघटनेच्या एका सदस्याने काही दिवसांपूर्वी एबीसी वाहिनीला एक चिथावणीखोर मुलाखत दिली होती.

2. आयएसआयएस आणि सोमालियाची दहशतवादी संघटना अल शबाव या संघटना हा झेंडा वापरतात.

3. या झेंड्याचा वापर सिरियाची फुटीरतावादी संघटना नुसरा फ्रंट किंवा जबात अल नुसरा करतात.

4. हा तालिबानच्या इस्लामिक इमिरातचा झेंडा आहे. तालिबानने 1996 पासून 2001 पर्यंत अफगानिस्तानात सरकार चालवले आहे.

5. हा सौदी अरबचा झेंडा आहे.