आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळखोर डेट्रॉइट आता उगवती बाजारपेठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे डेट्रॉइट शहर कधी काळी मोटारींचे शहर म्हणून ओळखले जात होते. फोर्ड कंपनीसह अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांचे कारखाने रात्रंदिन वेगाचा भास आणत होते. हळूहळू डेट्रॉइटचे वैभव मावळू लागले. ते दिवाळखोर झाले. गेल्या चार वर्षांत ७० हजारपेक्षा जास्त व्यापारी प्रतिष्ठान बंद झाले होते. शहराच्या अवस्थेत घसरणीची चिन्हे आतासुद्धा दिसून येतात. इकडे शहराच्या बिझनेस सेंटरमध्ये नव्या दमाने हालचाली सुरू झाल्या आहेत. लग्झरी हॉटेल, रेस्टॉरन्ट आिण बुटिकमध्ये वर्दळ िदसून येते. कंपन्यांची कार्यालये नव्या रूपाने नटू थटू लागली आहेत.
स्वस्त हाउसिंग आिण नव्या व्यवसायामुळे डेट्रॉइटमध्ये लोक बाहेरून येऊ लागले आहेत. शहराच्या पुनर्जीवनासाठी झटणाऱ्या लोकांमध्ये क्विकन लोन्स कंपनीचे संस्थापक डेन गिल्बर्ट यांचा समावेश आहे. २०१० नंतर गिल्बर्ट यांनी बिझनेस सेंटरमध्ये ६५०० नवे जॉब निर्माण केले आहेत. त्यांनी हजारो वर्ग फूट संपत्ती खरेदी करून १०० नवे बिझनेस आिण रिटेल भाडेकरूंना आकर्षित केले आहे. त्यात ट्विटर, होल फूड आदी फर्म सामील आहेत.
डेट्रॉइटच्या परिवहन सुविधा सुरळीत करण्यात येत आहेत. बिझनेस सेंटरच्या आसपासच्या क्षेत्राशी जोडण्यासाठी एम-१ रेल्वेसेवा २०१६ मध्ये सुरू होईल. १४ कोटी डॉलरच्या प्रकल्पात जीएम, पेन्स्के, क्विकन आिण इतर कंपन्यांची भागीदारी आहे. हायटेक आिण संशोधनाला प्राधान्ये देण्याचे काम वेगाने होत आहे. मिशीगन िवद्यापीठाचे चालकरहित कारांवर शोध सुरू आहे. कॉर्कटाउनमध्ये १४ कोटी ८० लाख डॉलर खर्चून हायटेक मॅन्युफॅक्चरिंग संस्था उभारली जात आहे.