आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sydney जाणून घ्या... अखेर का आणि कसे झाले लिंट कॅफेतील फायनल ऑपरेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - लिंट कॅफेमध्ये सोमवारी सुरू झालेले ओलिसनाट्य 17 तासांनंतर संपले. पोलिसांनी जेव्हा ओलिसांना वाचवण्यासाठी फायनल ऑपरेशन सुरू केले, त्यावेळी अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळात हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आणि सर्व ओलिसांना (दोघे वगळता) सुरक्षितपणे सोडवण्यात आले.

पोलिस कारवाईचा निर्णय
न्यू साऊथ वेल्स पोलिसांचा पहिला प्रयत्न हे प्रकरण शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा होता. सुमारे सहा तासांनंतर पोलिसांचा हल्लेखोराशी संपर्क झाला. त्यांच्यात चर्चा सुरू होती. पण रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास (भारतीय प्रमाण वेळेनुसार 8 वाजता) कॅफेमध्ये बाहेरच्या दिशेने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांचे धैर्य संपले. स्पेशल कमांडो टीमने लगेचच कॅफेकडे कूच केले. याठिकाणी असलेल्या सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या पत्रकार लिसा विसेंटिनने संपूर्ण ऑपरेशन स्वतः पाहिले.

अर्ध्या तासात खेळ खल्लास
लिसाने दिलेल्या माहितीनुसार, ‘कमांडो ऑपरेशन सुमारे अर्धा तासात संपले होते. पोलिसांनी कॅफेचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. त्यांनी लगेचच हल्लेखोर मोनिसला कंठस्नान घातले.
रोबोटची मदत
जेव्हा गोळ्यांचा आवाज थांबला आणि हल्लेखोर ठार झाला तेव्हा पोलिसांनी कॅफे पूर्णपणे रिकामे केले. तसेच शोध मोहिमेसाठी रोबोटची मदतही घेतली. हारूनने ब़ॉम्ब पेरले असून त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो, अशी शंका त्यांना होती. पण पोलिसांना बॉम्ब सापडलेच नाहीत.

बंधकांना कोणाच्या गोळ्या लागल्या?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारादरम्यान सात ओलिस कॅफेतून पळून बाहेर आले होते. या दरम्यान दोन ओलिसांना (लिंट कॅफेचा मॅनेजर टोरी जॉन्सन आणि वकील कॅटरीना डाउसन) यांचा मृत्यू झाला. पण त्यांना कोणाच्या गोळ्या लागल्या याचे स्पष्टीकरण देण्यास सध्या पोलिस टाळाटाळ करत आहेत. संपूर्ण चौकशीनंतरच माहिती देण्यात येणार असल्याचे पोलिस म्हणाले.